युनिव्हर्सल पासची लवकरच होणार अंमलबजावणी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांचा लोकल प्रवास बंद करण्यात आला आहे. मात्र, केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल प्रवास सुरू ठेवण्यात आला आहे. शिवाय, या प्रवाशांसाठी युनिव्हर्सल पास प्रणाली लागू करण्यात येणार आहे. परंतू, सध्यस्थितीत युनिव्हर्सल कोड प्रणाली अद्याप लागू झाली नसली, तरीही आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रवास करताना त्यासंदर्भात अनेकदा विचारणा केली जाते. यावर तोडगा म्हणून सरकारने ही प्रणाली लागू होत नाही, तोपर्यंत अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना जुन्या पद्धतीनुसार प्रवास करण्यासाठी संमती दिली आहे. मात्र, त्यासाठी ओळखपत्र जवळ बाळगणे बंधनकारक आहे.
१४ जून रोजी झालेल्या बैठकीत यासंदर्भात सरकारने चर्चा करुन प्रमाणित नियमावली तयार केली असून, ती लवकरच लागू होणार असल्याचं समजतं. कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात आलेल्या निर्बंधांच्या निकषानुसार युनिव्हर्सल प्रवास पासपद्धती निश्चित केली जाणार आहे.
या नियमांमुळे गरज असले प्रवासी प्रवास करू शकतील. ज्यांना प्रवासाची मुभा आहे त्यांनी प्रवास करताना स्थानिक, राज्य व केंद्र सरकारने दिलेले ओळखपत्र बाळगणे बंधनकारक आहे. युनिव्हर्सल प्रवास पास हा निर्बंध लावलेल्या क्षेत्रांच्या स्तराप्रमाणे देण्यात येणार आहे.
To read more, visit: www.mumbailive.com