हळू हळू

in #memarathi6 years ago

हळू  हळू एक एक शब्द वाचा

प्रत्येक वाक्यात किती अर्थ आहे


"अश्रु" _सांगून जाते,

"दुःख"  किती आहे ?


"विश्वास" _सांगून जातो,

"जोडीदार"  कसा आहे?


"गर्व" _सांगून जातो,

"पैशाचा माज"  किती आहे?


"संस्कार" सांगून जातात,_ 

"परिवार"  कसा आहे?


"वाचा" सांगून जाते,

"माणूस"  कसा आहे?  


"संवाद" सांगून जातो,

"ज्ञान"  किती आहे?


"ठेच"  सांगून जाते,

 "लक्ष"   कुठे आहे?


"डोळे"  सांगून जातात,

"व्यक्ती"  कशी आहे ?


"स्पर्श" सांगून जातो,

 "मनात"  काय आहे ?


आणि "वेळ" दाखवते,

"नातेवाईक"  कसे आहेत.



भावकीतली चार माणसं 

" एका दिशेने " 

तेव्हाच चालत असतात 

जेव्हा पाचवा खांद्यावर असतो. 


संपूर्ण आयुष्य आपण 

याच विचारात जगत असतो की 

" लोक काय म्हणतील " ? 

आणि शेवटी लोक 

हेच म्हणत असतात की 

" राम नाम सत्य है "..........


 माणसाची कदर करायची असेल 

तर जिवंतपणीच करा. 


कारण तिरडी उचलण्याच्या वेळी 

तिरस्कार करणारे सुद्धा रडतात. 


मेल्यावर माणूस चांगला होता 

असं म्हणण्याची प्रथा आहे 

आणि जिवंतपणी माणूस

ओळखता येत नाही 

हीच खरी व्यथा आहे. 

म्हणून माणसांना 

जिवंतपणीच समजून घ्या. 


मेल्यावर समाधीवर 

फुलं वाहण्यात 

काहीच अर्थ नसतो .......

   

चांगल्या माणसावर 

एवढा विश्वास ठेवा 

जेवढा आपण 

आजारपणात औषधांवर ठेवतो. 

कारण औषध जरी कडू असलं

तरी ते आपल्या फायद्याचेच असते. 


चांगल्या माणसांच सुद्धा 

अगदी तसचं असतं ..........

Coin Marketplace

STEEM 0.13
TRX 0.33
JST 0.034
BTC 112607.90
ETH 4350.64
SBD 0.85