Blog no 4steemCreated with Sketch.

in #krsuccesslast year

२६ मे २०२१ वैशाख पौर्णिमेचा अनुभव🙏
सौ. ममतावीरा योगेश तेंलग ( फोंडा - गोवा)

Lockdown असल्यामुळे किराणा, भाजीपाला अत्यावश्यक सेवा सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत गोव्यात आहे, हे आपल्या सर्वाना माहीती आहे. माझे पती योगेश यांच्या office ची वेळ सकाळी ८ ते संध्याकाळी ६ पर्यंत आहे, आणि माझा मुलगा जयदीप अडीच वर्षाचा असल्यामुळे बाहेर कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव असल्यामुळे आम्ही सहसा बाहेर पडत नाही. जे काही आवश्यक असेल तर ते आम्ही रविवारी (सुट्टी दिवशी) घेऊन येतो. रविवारी मी Mr. ना आठवण केली होती कैरीची, पण ते विसरले. २६ मे ला वैशाख पौर्णिमा पुजेची मांडणी केली, सगळी तयारी झाली, चनादाळ भिजवली होती, नंतर प्रश्न पडला, कैरी नाही प्रसाद कशा बनवयाचा? कारण वैशाख पौर्णिमा ला नैवद्य म्हणून कैरीचे पन्ह आणि आंबे दाळ हे दोन पदार्थ पाहीजेच. मनातुन बापूंना हाक मारली, कैरी नाही प्रसाद कशा करु, काहीच कळेना, मग ठरवले चणाडाळ भिजवली तर आहे, आंबे दाळ ऐवजी त्याचे पुराण करुन गोड नैवेद्य दाखवू या आणि पन्हे ऐवजी दुध साखर दाखवु या. बापुंना म्हणाले, तु मान्य करुन घे, नाइलाज आहे माझा😞. अस बापूंना म्हणाली, आणि kitchen च्या दिशेने धाव घेणार इतक्यात आमचे शेजारचे निलेश काकांनी आमच्या balcony मधुन "ममता" म्हणून हाक मारली. हाक ऐकताच balcony कडे गेली, बघते तर काय त्यांच्या कडे एक गोणी भरलेली होती ते म्हणाले, अग शेजारच्या बंगल्यात, तिथल्या लोकांनी आंब्याचे झाड तोडले आहे, मला गोणी भर कैरी दिले, तुला हवी आहे का. मी स्तब्ध राहीले. मला काहीच उमगेना, अंगावरती काटा उभा राहिला. मग मी म्हणाले, काका मला दोन कैरी बस झाले, काका म्हणाले अगं दोन कशाला चार घे... खुप आहे आपल्या कडे, हवे तेवढे घे. मी काकाला म्हणाले काका तुम्हाला माहिती नाही, तुम्ही माझा केवढा मोठा problem solve केला. आज वैशाख पौर्णिमा, मला कैरी पन्ह आणि आंबे दाळी चा नैवेद्य दाखवायचा होता देवाला🙏 आणि माझ्या कडे कैरीच नव्हती, तेच बापूंना म्हणाले, काय करू प्रसादाचे, तितक्यात तुम्ही माझ्या समोर कैरी घेवुन हजर😊 अंबज्ञ🙏

काका म्हणाले, तु बापूंसाठी प्रसादाचा विचार करत होती, आणि बघ बापूंनी तुझ्या साठी प्रसाद आणुन दिला😊. मी मात्र निमित्त ठरलो, खरंच देवाला आपल्या ज्या लेकरांकडुन सेवा करायची असते ना, ज्याच्या मनात भक्ती भाव असेल, चांगली निती असेल, तर त्याच्या मार्गातले अडथळे सहजरीत्या नष्ट करतो, त्याच्या पाठीशी हा भगवंत असतोच असतो. अंबज्ञ❤

खरचं अगदी छोट्या सा छोट्या गोष्टी सहजतेने पुर्ण करतो हा बापुराया🙏 ❤ Love u forever DAD❤ अंबज्ञ नाथसंविध
🙏

IMG_20230507_094053.jpg

Sort:  

Welcome to this platform @jitehh, First complete your Achievement 1 task which is introduction post on this platform, After completion of your achievement 1, you can join our community to write your regular post.

Community Link - Hindhwhale Community

You can contact me on discord if you have any doubts regarding this platform.

Discord Id - deepak94#7616

Regard,

@deepak94 (Admin) - Hindhwhale Community

Hind Whale Comment GIF.gif

Subscribe & Join Our Community
Telegram ----- Discord

Coin Marketplace

STEEM 0.20
TRX 0.12
JST 0.029
BTC 61205.14
ETH 3376.01
USDT 1.00
SBD 2.51