Dasbodh Dashak 1: Samas 1 दासबोध दशक १ : समास १

in #dasbodh2 years ago

ग्रंथाच्या सुरुवातीलाच श्रोते श्री सद्गुरू समर्थ रामदास स्वामींना विचारत आहेत की, आपण जो ग्रंथ सांगणार आहात त्याचे नाव काय आहे, यात काय सांगितले आहे आणि हा ग्रंथ श्रवण केल्याने काय लाभ होणार आहे? (१) या प्रश्‍नावर समर्थ सांगतात की, या ग्रंथाचे नाव दासबोध असून यात गुरुशिष्यांच्या संवादातून भक्‍्तिमार्गाचे स्पष्ट वर्णन करण्यात आले आहे. (२) नवविधा भक्तीचे स्वरूप, ज्ञानाची आणि वैरग्याची लक्षणे सांगून, विशेषतः अध्यात्मविद्येचे निरूपण यात केले आहे. (३) भक्तीच्या योगानेच मनुष्यास निश्‍चितपणे ईश्‍वराची प्राप्ती होते, हाच या ग्रंथाचा मुख्य सिद्धांत आहे. (४) मुख्यत: भक्तीचे स्वरूप काय, शुद्ध ज्ञान कशास म्हणावे, आत्मस्थितीची लक्षणे कोणती, याविषयीचे निःसंदेह प्रतिपादन या ग्रंथात केले आहे. (५) या ग्रंथात उत्कृष्ट उपदेश कसा असतो, सायुज्यमुक्‍ती म्हणजे काय, मोक्षप्राप्ती कशी करून घ्यावी, यांविषयी ठाम मते मांडली गेली आहेत.

(६) शुद्ध स्वरूपस्थिती कशी असते, विदेहावस्था म्हणजे काय, अलिप्तपणा म्हणजेच नि:संगता कशा प्रकारे मिळवावी हे सांगितले आहे. (७) मुख्य देव कोणता, त्यास कसे जाणावे, जाणता भक्‍त कसा असतो, जीवशिव यांचे स्वरूप कसे आहे, त्यांच्यात काय भेद आहे, याचे नि:संशय प्रतिपादन करण्यात आले आहे. (८) मुख्य देव म्हणजे परब्रह्म कशास म्हणावे, आपले खरे स्वरूप काय याविषयीची मते ठामपणे सांगून नाना मतांच्या गुंतागुंतीमुळे मनुष्य कसा चक्रावून जातो, हे त्या मतांचे स्वरूप सांगून स्पष्ट केले आहे. (९) या ग्रंथात मुख्यत: उपासना कशी करावी, कवित्वाची नाना लक्षणे कोणती आहेत, तसेच चातुर्याची विविध लक्षणे कोणती याचे वर्णन आले आहे. (१०)

मायेची उत्पत्ती कशी झाली, तिचे लक्षण कोणते, पंचमहाभूतांची लक्षणे कोणती आणि या सर्वांचा कर्ता कोण याविषयीचे विवेचन येथे केले आहे. (११) नाना कुशंका, नाना संशय, विविध आशंका आणि विविध प्रश्‍न यांचे समाधानकारक निरसन या ग्रंथात करण्यात आले आहे. (१२) या प्रकारे यात अनेक विषयांचे निरूपण केले गेले आहे. पण ग्रंथारंभीच त्या सर्वांसंबंधी कसे काय सांगता येईल ?(१३) तथापि एवढे म्हणता येईल की, हा ग्रंथ वीस दशकांत विभागला गेला आहे व प्रत्येक दशकात दहा समास आहेत. ज्या दशकात जो विषय सांगितला गेला आहे, त्याचे विवरण त्या त्या दशकात केले आहे. (१४) हा ग्रंथ उपनिषदे, वेदांत, श्रुती तसेच इतरही अनेक ग्रंथांच्या आधारे व मुख्यत: शास्त्रप्रचीती व आत्मप्रचीतीच्या आधारे लिहिला गेला आहे. (१५)

खरे तर अनेक ग्रंथांच्या आधारे हा लिहिला आहे म्हणून यास मिथ्या म्हणता येत नाही. हे तुमच्या प्रत्यक्ष अनुभवाला येणारच आहे. (१६) जे लोक मत्सराने यास मिथ्या ठरवितात, त्यांच्या हे लक्षातच येत नाही की, असे केल्याने ज्या नाना ग्रंथांच्या व भगवदूवचनांच्या आधारे हा ग्रंथ लिहिला गेला आहे, त्यांनाही ते मिथ्या ठरवीत असतात. (१७) शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूतगीता तसेच वेद आणि वेदांत, भगवदरीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता, उपनिषदे, भागवत, तसेच यांसारखेच अनेक ग्रंथ व मुख्यत: भगवद्‌वचनांच्या आधारेच यातील विषय मांडले गेले आहेत. (१८--२०)

भगवद्‌्बचनास अनुसरूनच येथे विषयप्रतिपादन केले आहे आणि भगवदूवाक्याविषयी अविश्वास ज्यास वाटेल, असा क्षुद्र व हीन कोण बरे असणार आहे? (२१) संपूर्ण ग्रंथाचा अभ्यास न करता जो कोणी या ग्रंथात दोष आहेत, असे मानून त्यास नावे ठेवतो, तो केवळ दुरभिमान व हीन ममनोवृत्तीमुळे मत्सराधीन होऊनच असे करीत असतो. (२२) वृथा अभिमानामुळे मत्सर वाटू लागतो व मत्सरामुळे तिरस्कार उत्पन्न होऊन अत्यंत प्रबळ असा क्रोधाचा आच म, मो. मि. याह, ग क. जो कामक्रोधाच्या अधीन झालेला असतो, त्यास भला कसे बरे म्हणावे ? अमृत पिण्याने वास्तविक अमरत्व प्राप्त व्हावयास हवे; पण कामक्रोधास वश झाल्यानेच अमृत पिऊनही राहूचे मरण ओढवलेच नाही का? (२५)

बरे आता हा विषय राहू दे. या ग्रंथातून ज्याने- त्याने आपापल्या कुवतीनुसार जे सार ते ग्रहण करावे. मुख्य म्हणजे अभिमानाचा त्याग करून याचा रसास्वाद घ्यावा हीच गोष्ट उत्तमोत्तम आहे. (२६) ग्रंथारंभी श्रोत्यांनी “या ग्रंथात काय आहे ?' असा जो प्रश्‍न केला होता, त्यासंबंधीचे सर्व विवेचन येथे थोडक्यात केले आहे. ,__ (२७) आता 'हा ग्रंथ श्रवण केल्याने काय फळ मिळते ?' या प्रश्‍नाचे उत्तर असे की, हा श्रवण केल्याने श्रोत्यांच्या मनातील सर्व संशय समूळ नष्ट होऊन त्यांच्या आचरणात तत्काळ फरक पडतो. (२८) कुठलेही अवघड साधन करावे न लागता आत्मोन्नतीचा सोपा मार्ग कोणता हे कळून सायुज्यमुक्‍तीचे रहस्य बसल्या ठिकाणीच अनायासे हाती येते. (२९) अज्ञान, दुःख, विपरीत ज्ञान नष्ट होऊन तत्काळ ज्ञानप्राप्ती होते. हीच याची फलश्रुती होय. (३०)

योगी ज्याला परमभाग्य मानतात, ते वैराग्य अंगी बाणते व अंतर्यामी विवेक उत्पन्न होऊन यथायोग्य चातुर्याची प्राप्ती होते. (३१) जे श्रवणापूर्वी अस्थिर अंतःकरणाचे अवगुणी व अवलक्षणी असतात, ते सुलक्षणी, चतुर, तार्किक व कुशाग्र बुद्धीचे तसेच वेळप्रसंग पाहून योग्य आचरण करणारे होतात. ( जे श्रवणापूर्वी आळशी होते ते उद्योगी बनतात, जे कुणी पापी होते, त्यांना कृतकर्माचा पश्‍चात्ताप होऊन त्यांची चित्तशुद्धी होऊ लागते. जे कुणी श्रवणापूर्वी भक्तिमार्गाची निंदा करीत असतात, ते आता श्रवणामुळे भक्तीचे महत्त्व कळल्याने तिची प्रशंसा करू लागतात. (३३) बद्ध असतात, ते ग्रंथश्रवणाने मुमुक्षू बनतात. मूर्ख असणारे अतिदक्ष बनतात व भक्‍्तिमार्गाचे अवलंबन केल्याने पूर्वी अभक्त असणारेही मोक्षप्राप्ती करून घेतात. (३४) केवळ श्रवणाच्या योगे नाना दोष नष्ट होऊन पतितही 'पावन होतात व त्या त्या व्यक्‍तींना उत्तम गती प्राप्त होते. (३५)

श्रवणाने दढ देहबुद्धीमुळे होणारे नुकसान (दुःख, शोकादि) तसेच कुतर्क व संशय आणि नाना प्रकारचे सांसारिक उद्वेग (अर्थात त्रिताप, पंचक्लेशादी) नष्ट होतात. (३६) या ग्रंथाची फलप्राप्ती अशी आहे की, केवळ श्रवणाने अधोगती तर चुकतेच; शिवाय मनास सहज संतोषरूपी समाधान लाभून परम विश्रांतीही प्राप्त होते. (३७) ज्याचा जसा भावार्थ असेल त्याप्रमाणे त्यास तसा लाभ होतो. एखाद्याच्या मनात मत्सरादी, वाईट भांव असेल तर त्याच्या भावास अनुसरूनच त्यास फलप्राप्ती होते. (३८)

Coin Marketplace

STEEM 0.21
TRX 0.13
JST 0.030
BTC 67753.34
ETH 3502.65
USDT 1.00
SBD 2.82