vodaphone and Idea cellular will merge

in #vodaphone6 years ago

 नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने (एनसीएलटी) अखेर  व्होडाफोन इंडिया आणि आयडिया सेल्युलर यांच्या विलीनीकरणाला मंजूरी दिली  आहे. त्यामुळे व्होडाफोन आयडीया लि. ही भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी  अस्तित्वात येणार आहे. गेल्या पंधरा वर्षापासून नंबर वन क्रमांकावर  असलेल्या एअरटेलचे स्थान यामुळे हिरावले जाणार आहे. व्होडाफोन आयडियाचे  देशभरात 44.3 कोटी ग्राहक असणार आहेत. तर एअरटेलच्या ग्राहकांची संख्या  34.4 कोटी इतकी आहे. 

यापूर्वी दूरसंचार मंत्रालयाने व्होडाफोन  इंडिया आणि आयडिया सेल्युलर यांच्या विलिनीकरणाला परवानगी दिली. आयडिया  सेल्युलर आणि व्होडाफोन इंडिया यांनी संयुक्तपणे 7,268.78 कोटी रुपयांचा  भरणा केल्यानंतर दूरसंचार खात्याने दोन्ही कंपन्यांच्या विलिनीकरणाला  परवानगी दिली आहे. व्होडाफोन आणि आयडिया या दोन कंपन्यांच्या  विलिनीकरणानंतर अस्तित्वात येणाऱ्या कंपनीचे नाव व्होडाफोन-आयडिया असे  असणार आहे. ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असणार आहे.   व्होडाफोन आयडिया अस्तित्वात आल्यानंतर जिओ आणि  एअरटेलसमोर मोठेच आव्हान निर्माण होणार आहे. याआधी 2016 मध्ये मुकेश  अंबानीच्या जिओची सेवा बाजारात उपलब्ध झाल्यानंतर आयडिया सेल्युलरला  प्रत्येक तिमाहीत मोठाच तोटा होत होता. त्यामुळे व्होडाफोन आणि आयडिया  यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता. याबरोबर संचालक मंडळ नॉन कन्वर्टीबल  सिक्युरीटीजद्वारे 15,000 कोटी रुपयांचे भांडवल उभे करण्याचा प्रस्ताव समोर  आणणार आहे. यामुळे कंपनी आर्थिक आघाडीवर सक्षम होत रिलायन्स जिओ आणि  एअऱटेलसारख्या प्रतिस्पर्धी कंपन्यांशी दोन हात करण्यास तयार होणार आहे. या  विलिनीकरणामुळे व्होडाफोन आयडिया ही देशातली सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी  बनली आहे.  देशातले दूरसंचार क्षेत्रातले 42 टक्के ग्राहक  आणि 37 टक्के महसूल एकट्या व्होडाफोन आयडियाचे असणार आहेत. या  क्षेत्रातल्या तज्ज्ञांनीसुद्धा कंपनीचे नवीन नाव कंपनीच्या व्यवसायाला  साजेसे असल्याचे म्हटले आहे. व्होडाफोनचे ग्राहक मुख्यत: शहरी भागात असून  आयडियाची ताकद मुख्यत: ग्रामीण भागात आहे. या नव्या ब्रॅंडमध्ये सर्व  प्रकारचा ग्राहकवर्ग सामावला जाणार असून दोन्ही कंपन्यांसाठी ही गोष्ट  फायदेशीरच ठरणार आहे, 

Coin Marketplace

STEEM 0.30
TRX 0.12
JST 0.034
BTC 64513.75
ETH 3146.11
USDT 1.00
SBD 3.95