मराठी चित्रपटसृष्टी
बहुतांश मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांचे मराठीप्रेम हे हंगामी असते , हे वारंवार दिसून आले आहे. जेव्हा केव्हा त्यांचे चित्रपट प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर येतात ,तेव्हाच त्यांना मराठीची आठवण येते.
मग त्यांच्या पोस्ट मराठीत सुरु होतात, मग काही दिवस भाषेच्या नावाखाली चित्रपट चालण्यासाठी भावनिक आवाहन केले जाते . झालं , एकदा का चित्रपट भरगोस कमाई करून सिनेमागृहातून उतरला की संपला यांचं मराठीप्रेम . नंतर मग कधी एखाद्या सणावाराला आठवण झाली मराठीची तर तेवढ्या शुभेछया काय त्या मराठीत द्यायच्या नाहीतर त्याही नाही . तर अशी आहे आपली मराठी चित्रपटसृष्टी.
आता रजनीकांतच सुपरस्टार का आहेत आणि ए आर रेहमानच जगविख्यात संगीतकार का आहेत, याचा विचार आता करावा लागेल ?